Municipal Election
sakal
ओझर: जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या ओझर नगरपरिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षातर्फे तयारी सुरू झाली आहे. सध्याची स्थिती पाहता शिवसेना (उबाठा) आणि भाजपमध्ये या निवडणुकीत जोरदार टक्कर असेल असे दिसते. अपक्षांची संख्याही मोठी असण्याच्या शक्यतेने तिरंगी किंवा चौरंगी, चुरशीच्या लढती होतील असे दिसते. एकूण भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम व आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची असेल.