Municipal Election
sakal
ओझर: जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या ओझर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्वच पक्षांतर्फे निवडणूक स्वबळावर लढविण्याची जय्यत तयारी केली जात असून, वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. आपापल्या पॅनलसाठी प्रत्येक प्रभागातून उमेदवार चाचपणीचे काम सुरू असून, उमेदवार निश्चित केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक तिरंगी किंवा चौरंगी होण्याचे चित्र आजतरी दिसत आहे. त्यामुळे निवडणूक रंगतदार होईल.