ओझर: निफाड तालुक्यातील तब्बल ५४ शेतकऱ्यांना काही रोख रक्कम देत विश्वास संपादन करून उर्वरित रकमेचे धनादेश देवून सुमारे एक कोटी चाळीस लाखांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात ओझर पोलिसांना यश आले आहे. संशयित व्यापारी दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.