Fake Kidnapping
sakal
ओझर: स्पर्धेत टिकण्यासाठी पाल्यांकडून प्रत्येक पालकाची मोठी अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. परंतु शिक्षक-पालकांच्या या मानसिक दबावातून काही दुर्दैवी घटना घडतात. अशाच मानसिक तणावातून ओझर येथे दोन दिवसांत दोन शालेय विद्यार्थ्यांनी स्वताच्याच अपहरणाचा बनाव केला; मात्र ओझर पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळत विद्यार्थ्यांच्या पालकांचे समुपदेशन करीत, वर्दीतल्या पालकांचीही जबाबदारी यशस्वीपणे निभावली.