Ozar Bank
sakal
ओझर: येथील दि ओझर मर्चंट को-ऑप. बँकेला २०२४- २०२५ या आर्थिक वर्षात ३१ मार्च २०२५ अखेर सर्व तरतुदी वजा जाता ८७ लाख ८४ हजार रुपयांचा नफा झाला. सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याची तरतूद आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या परवानगीनंतर नफावाटपाची घोषणा अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांनी केली. दरम्यान, सभासदांनी दहा टक्के लाभांश वाटप करण्याची मागणी केली आहे.