नाशिक: पालघर जिल्ह्यात वनविकास महामंडळाच्या ठाणे विभागातील शिरसाड, मांडवी व गणेशपुरी परीक्षेत्रातील पथकांनी अवैध लाकूडतस्करीविरोधात मोठी कारवाई केली. रात्रगस्ती दरम्यान सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. यात ५५४ नग खैर लाकूड (१०.६१४ घनमीटर), चार वाहने तसेच अन्य साहित्य असा एकूण ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.