Election
sakal
पंचवटी: पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसला साथ देणारा हा प्रभाग पाच वर्षानंतर भाजपच्या ताब्यात गेला. तेव्हापासून आजतागायत भाजपचा हक्काचा प्रभाग म्हणून सतत पाठीशी राहिला. २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे चारही उमेदवार निवडून आल्याने प्रभागाला अडीच वर्ष महापौर, सलग दोन वर्ष स्थायी समितीचे सभापती, एक वर्ष भाजपचे गटनेते आणि प्रभाग समितीचे सभापती पदे मिळाली. त्यामुळे कॉलेज रोड, गंगापूर रोडसारखी चकाकी मिळेल, असे अपेक्षित होते परंतु मतदारांचा अपेक्षा भंग ठरला.