Nashik : 3 दिवस पंचवटी रद्द

Nashik Panchavati Express
Nashik Panchavati Expressesakal

नाशिक रोड : पंचवटी एक्स्प्रेस (Panchavati Express) तीन दिवस रद्द असल्यामुळे चाकरमान्यांना रस्त्याने व बसने प्रवास करावा लागणार आहे. २५ ते २८ जून दरम्यान पंचवटी रद्द करण्यात आलेली असून रेल्वेने त्यासंदर्भातील वेळापत्रक (Timetable) नुकतेच जाहीर केले आहे. (Panchavati express canceled for 3 days Nashik News)

Nashik Panchavati Express
Nashik : आमदार सुहास कांदे नेमके कोठे?

मनमाड ते अंकई दरम्यान रेल्वे मार्गाचे काम करायचे असल्याने पंचवटी, जनशताब्दी, नंदिग्राम, राज्यराणी आदी गाड्या २५ ते २८ जून दरम्यान बंद ठेवण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने दिली. पंचवटी शनिवार २५ जूनपासून ते मंगळवार २८ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. बुधवारी मुंबईला जाताना पंचवटी सुरु आहे. मात्र, यादिवशी मुंबईहून नाशिकला येताना ती रद्द आहे. जनशताब्दी २५ ते २८ जून या काळात बंद राहील. मुंबईला जाणारी नंदिग्राम २६ आणि २७ जूनला तर मुंबईहून सुटणारी २७ आणि २८ जूनला, नांदेडहून मुंबईला जाणारी राज्यराणी २६ आणि २७ जूनला तर मुंबईहून नांदेडला जाणारी राज्यराणी २७ आणि २८ जूनला रद्द आहे.

Nashik Panchavati Express
नवीन बसस्थानक, कुसुंबा रस्ता भागातील 215 अतिक्रमणधारकांवर कारवाई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com