Panchavati protest
sakal
पंचवटी: मेरी–रासबिहारी लिंक रोडवरील खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरू असून, गेल्या महिन्याभरात तीन जणांचा जीव गेला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. ३) सकाळी अकराला आरटीओ, कॉर्नर येथे रास्ता रोको आंदोलन करत रस्त्याच्या रुंदीकरणाची मागणी केली.