Nashik Crime News : पंचवटी खुनातील अल्पवयीन सुधारगृहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Nashik Crime News : पंचवटी खुनातील अल्पवयीन सुधारगृहात

नाशिक : मखमलाबाद लिंक रोडवर तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन अल्पवयीन मुलांची बाल सुधारगृहात रवानगी केली आहे. पंचवटी पोलिसांनी दोघांना मंगळवारी (ता. २४) बाल न्यायालयासमोर हजर केले होते. (Panchavati murder in Juvenile Correctional Home Nashik Crime News)

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

शनिवारी (ता. २१) सातपूर येथील ऋषिकेश दिनकर भालेराव (१९) या तरुणाच्या हत्येची उकल पंचवटी पोलिसांनी केली. सातपूर पोलिसात ऋषिकेशच्या बेपत्ताची तक्रार दाखल होती. त्याची ओळख पटविल्यानंतर, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण,

सहायक आयुक्त सीताराम गायकवाड, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या सूचनेनुसार निरीक्षक (गुन्हे) युवराज पत्की यांनी तपास करीत खुनाचा उलगडा केला. सहायक निरीक्षक सत्यवान पवार यांनी संशयित पळून गेलेल्या मुंबईतील नातेवाईकांशी संपर्क केला.

हेही वाचा: Jalgaon Crime News : वडनगरीतील कथित उच्च वर्णीयांविरुद्ध Atrocity दाखल

त्यानंतर सोमवारी दुपारी दोघा मुलांना ताब्यात घेण्यात आले. दोघांना मंगळवारी (ता. २४) युवराज पत्की यांनी बालन्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना तात्पुरता बालसुधारगृहाकडे सोपविण्याचे आदेश दिले.

दोघेही संशयित हे अल्पवयीन आहेत. यातील एक १६ तर दुसरा १७ वर्षांचा असून, ते अकरावी व बारावीच्या वर्गात शिक्षण घेतात. दोघांची कौटुंबिक स्थिती सामान्य असून ते पेठ रोड परिसरातील रहिवासी आहेत

हेही वाचा: Satara Crime News: जावळीत अवैध व्‍यावसायिकांचे धाबे दणाणले