Kumbh Mela
sakal
पंचवटी: मागील सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांना गोदावरीत स्नान करणे सुलभ व्हावे आणि गर्दीवर नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने गोदाकाठावर नांदूर व मानूर परिसरात घाट बांधण्यात आले होते. मात्र, आज बारा वर्षांनंतर या दोन्ही घाटांची दुरवस्था झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तरी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष केंद्रित करून घाटांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.