Vi चा बंपर धमाका; 6 कोटी ग्राहकांना मिळणार फ्री रिचार्ज

व्होडाफोन-आयडियाने एयरटेलप्रमाणे ७९ रुपयांच्या पॅकसोबत ग्राहकांना दुहेरी फायदा देण्यासाठीच्या प्लॅनची घोषणा केली आहे.
VI
VIGoogle file photo
Summary

व्होडाफोन-आयडियाने एयरटेलप्रमाणे ७९ रुपयांच्या पॅकसोबत ग्राहकांना दुहेरी फायदा देण्यासाठीच्या प्लॅनची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली : भारतातील प्रमुख दूरसंचार कंपनी असलेल्या वी (Vodafone Idea) ने आपल्या ग्राहकांसाठी एक बंपर धमाका आणला आहे. कोरोना महामारीच्या काळात Vi ने रिलिफ ऑफर जारी केली आहे. ज्याचा फायदा कंपनीच्या ६ कोटी ग्राहकांना होणार आहे. Vi ने आपल्या ६ कोटी ग्राहकांना ४९ रुपयांचा रिचार्ज पॅक फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे Vi च्या ग्राहकांना ४९ रुपयाचा पॅक मोफत मिळणार आहे. (Vi makes Rs 49 plan free of cost to 6 crore customers plan under COVID-19 relief)

Vi च्या ४९ रुपयांच्या पॅकमध्ये ३८ रुपये टॉकटाइम मिळतो. तसेच ३०० एमबी इंटरनेट डाटाही मिळतो. या प्लॅनची बैधता २८ दिवसांसाठी असते. व्होडाफोन-आयडियाने एयरटेलप्रमाणे ७९ रुपयांच्या पॅकसोबत ग्राहकांना दुहेरी फायदा देण्यासाठीच्या प्लॅनची घोषणा केली आहे.

VI
Clubhouse App या आठवड्यात भारतात होणार लाँच; जाणून घ्या नवीन फीचर्सबद्दल

लॉकडाउनच्या काळात कामकाज बंद असल्याने जे ग्राहक रिचार्ज करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी Vi ने एअरटेलप्रमाणे दोन ऑफर जाहीर केल्या आहेत. Viने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ४९ रुपयांचा रिचार्ज त्यांच्या ६ कोटी ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. या ऑफरसाठी कंपनी २९४ कोटी रुपये खर्च करणार आहे.

७९ रुपयांच्या कॉम्बो पॅकसोबत ६४ रुपयांचा टॉकटाइम मिळतो, पण डबल डाटा ऑफरनुसार ग्राहकांना आता १२८ रुपयांचा टॉकटाइम, २०० एमबी डाटा आणि २८ दिवसांची वैधता मिळेल. या आधी एअरटेलने ४९ रुपये आणि ७९ रुपयांच्या प्लॅनची घोषणा केली होती. एअरटेलच्या ५.५ कोटी ग्राहकांना ४९ रुपयांचा रिचार्ज मोफत मिळत आहे. तसेच ७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये डबल डाटा ऑफर मिळत आहे.

VI
Google Maps पुढील काळात आणणार 'हे; महत्वाचे फीचर्स; जाणून घ्या

दरम्यान, याआधी रिलायंस जिओने जिओफोन यूजर्ससाठी ३०० मिनिटांपर्यंतचे कॉलिंग मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. सर्व जिओफोन यूजर्सना याचा फायदा होईल, असे जिओने स्पष्ट केले होते. यानुसार जिओफोन ग्राहक दररोज १० मिनिटे मोबाईलवरून मोफत संपर्क करू शकतात. दररोज १० मिनिटे यानुसार दरमहा ३०० मिनिटे मोफत आउटगोईंग कॉलिंगची सुविधा देणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहा:कार माजवलाय. कोरोना संकटामध्ये भारताच्या मदतीसाठी सर्वजण धावून आले आहेत. यामध्ये टेक क्षेत्रातूनही मदत येत आहे. देशातील आघाडीची टेलिकॉम कंपनी Vi नेही आपल्या ग्राहाकांना खास मदत केली आहे.

साय-टेक विश्वातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com