Crime
sakal
पंचवटी: हिरावाडी परिसरात गस्त घालत असलेल्या पंचवटी विभागाच्या निर्भया पथकाच्या सतर्कतेमुळे घरी कोणालाही न सांगता निघून गेलेल्या दोन लहानग्यांचा सुखरूप शोध लागला. बनारसी नगर येथे वास्तव्यास असलेले रामदास पुंड (३६) यांनी सोमवार (ता. २९) दुपारी निर्भया पथकाशी संपर्क साधून त्यांची मुलगी आणि भावाचा मुलगा दुपारी साडेतीन ते चार वाजेपासून बेपत्ता झाल्याचे सांगितले होते.