पंचवटी: श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचा कार्यकारिणी फलक लावण्यावरून आजी-माजी अध्यक्षांमध्ये झालेला वाद पोलिस ठाण्यात पोहोचला आहे. आजी-माजी अध्यक्षांनी एकमेकांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात अर्ज केल्याने नवीन वादाला तोंड फुटले असून, पोलिस काय कारवाई करतात याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे.