election
sakal
पंचवटी: विभागात राजकीय दृष्ट्या संवेदनशील राहिलेल्या प्रभाग तीनमध्ये यंदाही भाजपकडून इच्छुकांची रांग लागली आहे. एकेकाळी प्रभाग तीन राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्ती आता ठराविक भागात आहे. पंचवटी विभागात एकमेव शिवसेनेच्या नशिबी आलेला हा प्रभाग मागील निवडणुकीत राहिला. यंदा मात्र शिवसेनेत फूट पडल्याने आता शिवसेनेची शक्ती विभागली गेली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इच्छुक भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीची शक्यता अधिक आहे.