Crime
sakal
पंचवटी: म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील ‘कॅटल हाउस’ हॉटेलमध्ये गंगापूर रोडवरील एका व्यावसायिक फोटोग्राफर तरुणीसह तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये डांबून ठेवत बंदुकीचा धाक दाखवत शरीरसुखाची मागणी करण्यासह अनैतिक व्यवसाय करण्यास सांगितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितासह वेटरला ताब्यात घेतले आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.