Panchayat Samiti
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित झाल्यावर जिल्ह्यातील पंधराही पंचायत समित्यांमधील सभापतिपदांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी (ता. २९) सकाळी अकराला सोडतीची प्रक्रिया पार पडेल. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.