Panchvati Burglary Case: Arrest of Accused : नाशिकमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला अटक करून त्याच्याकडून आलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला.
पंचवटी: म्हसरूळ गुन्हेशोध पथकाने घरफोडी करणारा विधीसंघर्षित ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून तीन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.