पंचवटी: आडगाव शिवारातील ट्रक टर्मिनल्सजवळ उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या राहाता (जि. अहिल्यानगर) येथील पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आडगाव गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. या संशयितांकडून तीन लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.