Sagar Jadhav
sakal
नाशिक/पंचवटी: पंचवटीतील राहुलवाडीत बुधवारी (ता. १७) पहाटे साडेबारा-एकच्या सुमारास निकम-वाघ टोळीच्या गुंडांनी उघडे टोळीचा सराईत गुन्हेगार सागर जाधव याच्यावर गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात सागर जखमी झाला असून, त्याच्या मानेत एक गोळी अडकली आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.