Goda Park
sakal
पंचवटी: रामवाडी परिसरात गोदावरी नदीकाठी असलेल्या निसर्गरम्य परिसरात ‘गोदा पार्क’ प्रकल्पाला स्मार्टसिटीच्या माध्यमातून एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. सुमारे १७ कोटी खर्च करून झालेला हा प्रकल्प खुला झाल्याने गोदाकाठच्या सौंदर्यात भर पडली. ‘गोदा पार्क’ सुरू होताच नाशिककरांसह शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले अलगदपणे पार्ककडे वळल्याने याठिकाणी गर्दी झाली.