Truck
sakal
पंचवटी: मुरूम वाहून नेणाऱ्या विनानंबरप्लेट हायवा ट्रकला तपासणीसाठी थांबविणाऱ्या मंडल अधिकारी आणि दोन सहकाऱ्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा धक्कादायक प्रकार म्हसरूळ चौकी परिसरात घडला. खनिज माफियांच्या या निर्ढावलेल्या कृत्यामुळे महसूल अधिकाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हसरूळ पोलिसांनी या प्रकरणातील तिघा संशयितांचा शोध सुरू केला आहे.