Crime
sakal
नाशिक
Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत
Fugitive Suspect Apprehended in Rahulwadi Firing Case : नाशिक पंचवटीतील सागर जाधव गोळीबार प्रकरणातील १४वा संशयित दीपक वीर यास पोलिसांनी मखमलाबाद येथून अटक केली. टोळीयुद्ध व माजी नगरसेवकाच्या सहभागामुळे प्रकरणाला राजकीय किनार.
पंचवटी: फुलेनगरमधील राहुलवाडी येथे सागर जाधववर झालेल्या गोळीबार प्रकरणातील फरारी संशयितास मखमलाबाद येथून जेरबंद करण्यास पंचवटी गुन्हेशोध पथकास यश मिळाले. यामुळे अटक झालेल्या संशयितांची संख्या आता १४ झाली आहे; तर उर्वरित आठ जणांचा शोध सुरू आहे. दीपक सुनील वीर (वय ३३, रा. पेठ रोड) असे संशयिताचे नाव आहे.
