SAKAL Special : पंडित पलुस्कर सभागृह कुलूपबंदच! सुशोभीकरणाचे काम पूर्ण होऊनही हस्तांतर नाही

Paluskar Auditorium which is closed
Paluskar Auditorium which is closedesakal

Nashik News : पंचवटीतील धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र असलेल्या पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर सांस्कृतिक भवनाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले असताना केवळ हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी हे सभागृह बंद आहे.

महापालिकेच्या स्मार्टसिटीने दोन कोटी रुपये खर्च करून या सभागृहाचे सुशोभीकरण केले. पण नाट्यगृहाचा पडदा अद्याप न उघडल्याने नाट्यकलावंतासह रसिकांमध्ये नाराजी पसरली आहे. (Pandit Paluskar auditorium locked No handover even after completion of beautification work SAKAL Special nashik news)

पंचवटी कारंजा येथील पंडित पलुस्कर सभागृह हे नवोदितांचे व्यासपीठ म्हणून ओळखले जाते. ज्यांना महाकवी कालिदास कलामंदिर किंवा सार्वजनिक वाचनालयाचे परशुराम साईखेडकर नाट्यगृहाचे भाडे परवडत नाही, अशा व्यक्तींसाठी पंडित पलुस्कर हे सोयीचे ठरते.

येथे नवोदित कलाकारांसह वसंत करंडक, एकांकिका स्पर्धा आयोजित केल्या जातात. २०२१ पासून या सभागृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे तेव्हापासून ते बंद आहे. स्मार्टसिटीने या सभागृहाची दुरुस्ती करताना संपूर्ण हॉल एसी केला आहे.

त्याचबरोबर आसन व्यवस्थेसह स्टेजचा आकारही वाढवला. कलाकारांना उपयुक्त ठरणाऱ्या सुविधा देवू केल्यामुळे या सभागृहाचा वापर अधिक वाढेल. देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेला अधिक मदत होईल, अशीच भावना यामागे आहे.

परंतु, काम पूर्ण होऊन अनेक दिवस झाले तरी अद्याप हे सभागृह महापालिकेकडे हस्तांतरित झालेले नाही. तांत्रिक बाबींची तपासणी होणे बाकी असल्यामुळे त्यासाठी किती अवधी लागेल आणि कधी हे सभागृह वापरात येणार याची नाट्यरसिकांना प्रतीक्षा लागून आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Paluskar Auditorium which is closed
Nashik News: सुरगाणा तालुक्यात ठाणगाव बाऱ्हे येथे 50 ते 60 जणांना महाप्रसादातून विषबाधा; आकडा वाढण्याची भीती

भाडेवाढ निश्चित

पंडित पलुस्कर सभागृहाच्या वापरासाठी यापूर्वी ५०० ते एक हजार रुपये भाडे आकारले जात होते. सुशोभीकरणामुळे येथील कलावंतांना व रसिकांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. देखभाल- दुरुस्तीसाठी या सभागृहाच्या दुरुस्तीपोटी खर्च वाढणार असल्याने दोन हजार रुपयांपर्यंत भाडे आकारले जाण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही.

"पंडित पलुस्कर सभागृह महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचे पत्र प्राप्त झाले आहे. तांत्रिक बाबींची अद्याप चौकशी पूर्ण झालेली नसल्यामुळे मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हे सभागृह महापालिकेकडे चालवण्यास दिले जाईल."

- जे. के. कहाणे, व्यवस्थापक, पंडित पलुस्कर सभागृह

"सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले असताना केवळ हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी हे सभागृह वापरता येत नाही. त्यामुळे नवोदित कलाकारांचे नुकसान होते. कालिदास कलामंदिराचे भाडे ज्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी पंडित पलुस्कर हे सभागृह उत्तम आहे. महापालिकेने याचा वेळीच विचार करून सभागृह सुरू केले पाहिजे."

- वसंत ठाकूर, संस्थापक अध्यक्ष, कॉलेज कॅम्पस फ्रेंड सर्कल

Paluskar Auditorium which is closed
Unseasonal Rain : उत्राणेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; पोल्ट्री शेड जमीनदोस्त अन् घरांचेही नुकसान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com