नाशिक- महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांची महात्मानगर येथील पंड्या हॉस्पिटल प्रकरणात हलगर्जी केल्यामुळे प्रतिनियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा मूळ सेवेत म्हणजेच संदर्भसेवा रुग्णालयात हजर राहावे लागणार आहे. मात्र त्यापूर्वी डॉ. चव्हाण यांनी काही वादग्रस्त फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याने त्या प्रकरणाची चौकशी झाल्याशिवाय त्यांना कार्यमुक्त केले जाणार नसल्याचे बोलले जात आहे.