सातपूर: पर्यावरण व नदी संवर्धन खात्याच्या मंत्री पंकजा मुंडे शुक्रवारी (ता. १) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी प्रदूषणाबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळााने (एमपीसीबी) महापालिका प्रशासन आणि औद्योगिक विकास महामंडळाला सुचविलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतील.