सव्वा लाख खर्च अन् उत्पन्न 17 हजार; पपईबाग उद्ध्वस्त

papaya
papayaesakal

जळगाव नेऊर (जि.नाशिक) : पारंपरिक पिके सोडून फळबाग लागवड करून मोठ्या उत्पन्नाच्या आशेवर पपई बागेवर केलेला सव्वा लाख रूपये खर्च, मातीमोल भावामुळे केलेला खर्च व त्यातून मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ बसत नसल्याने जळगाव नेऊर येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब छबू शिंदे यांनी शुक्रवारी (ता.१७) दोन एकर बहरलेल्या पपईबागेवर ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटरी मारून पूर्ण पपईबाग उद्ध्वस्त केली.

सव्वा लाख खर्च अन उत्पन्न सतरा हजार

उन्हाळ कांद्याचे महागडे कांदा रोप घेण्यापेक्षा श्री. शिंदे यांनी आपली मुले गोकुळ शिंदे, किरण शिंदे यांना विश्वासात घेऊन तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेती करण्यासाठी पाऊल उचलले. त्यानुसार २८ डिसेंबर २०२० ला दोन एकर क्षेत्रात तैवान- ७८६ पपई बागेची लागवड केली. त्यात आंतरपीक म्हणून टरबूजाची लागवड केली होती. टरबूजाचे जेमतेम अल्प उत्पादन हाती आले होते. परंतु पपई बागेतून चांगले उत्पन्न हाती येईल या आशेवर पपई पिकावर खर्च केला. त्यात पपई रोप अठराशे नग २७००० रूपये, शेणखत, लिक्विड खत, रासायनिक खते, मिक्स डोस, मल्चिंग पेपर, मशागत, मजुरी आदी एक लाख रूपये अशाप्रकारे एकुण अंदाजे सव्वा लाख रूपये खर्च झाला. त्याबदल्यात अवघे सतरा हजार रूपये उत्पन्न आले.

papaya
अवघ्या 21 दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता...!

खर्चही निघाला नाही

केलेला खर्चाचा तपशील बघता तेवढा खर्च वसूल होणार नाही अशी परिस्थिती झाल्याने नाईलाजाने शेतकरी पुत्रांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटरी मारून पपई बाग उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. झालेला सव्वा लाख रूपये खर्च वसूल न झाल्याने आहे ते भांडवल खर्ची झाले. मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

मातीमोल भावाने हैराण

टोमॅटो, शिमला मिरची, साधी मिरची आदी पिकविलेल्या शेतमालाला मातीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः शेतमालाला शेताच्या बांधावर, उकीरड्यावर व रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केल्याच्या घटना दिसून आल्या. काही शेतकऱ्यांनी तर केलेला खर्च ही वसूल होणार नसल्याने टोमॅटो व शिमला मिरची उपटून फेकली. शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करून पुढील पिकाचे नियोजन करावे लागते.

papaya
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

आमच्या कुटूंबाने प्रयोगशील शेती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मोठ्या कष्टाने दोन एकर पपई बाग सव्वा लाख रूपये खर्च करून उभी केली. परंतु मातीमोल भावामुळे नऊ महिने हाताच्या फोडाप्रमाणे जपलेले पपईची बाग ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटा मारून पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा निर्णय घेतला. - बाळासाहेब शिंदे, पपई उत्पादक शेतकरी, जळगाव नेऊर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com