अवघ्या 21 दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता...!

bride
brideesakal

देवळा (जि.नाशिक) : गेल्या २७ ऑगस्टला लग्नगाठ बांधली अन्‌ संसार सुरू झाला. भावी आयुष्यातील सुखाची स्वप्ने रंगवत असताना दुर्दैवाने केवळ २१ दिवसांचाच संसार तिच्या नशिबात होता... लग्नाच्या वेळी काढलेल्या मेंदीचा रंग अद्याप सुकलेला नव्हता...मन हेलावणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले नेमके?

लग्नगाठ बांधली अन्‌ संसार सुरू झाला...पण....

‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी-अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी...’ अशी हृदयद्रावक घटना लोहोणेर येथे गुरुवारी (ता. १६) घडली. बागलाण तालुक्यातील लोहोणेर येथे वास्तव्यास असलेले आदित्य शेवाळेंचा विवाह गेल्या महिन्यात २७ तारखेला अंबासन येथील शेतकरीकन्या शीतल आहिरे हिच्याबरोबर उत्साहात झाला. मोठ्या आनंदाने या नवदांपत्याने आपल्या कौटुंबिक सुखाची स्वप्ने पाहत संसाराला प्रारंभ केला खरा; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

bride
शाळाच नाही अन् नोकरभरतीचा प्रयत्न! इगतपुरीतील प्रकार

अन् नवविवाहिता शीतलची प्राणज्योत मालवली.

विवाहानंतर आपल्या सुखी संसाराची स्वप्ने रंगविण्यात दंग असलेल्या नवविवाहित शीतलची सहा दिवसांपूर्वी अचानक प्रकृती बिघडली. तिला सटाणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, येथे तिच्या प्रकृतीत योग्य ती सुधारणा न झाल्याने दोन दिवसांनी मालेगाव येथे हलविण्यात आले. तेथे दोन दिवस उपचार घेतल्यानंतर नाशिक येथे दाखल केले. तेथे शीतलवर उपचार सुरू असतानाच गुरुवारी (ता. १६) पहाटे शीतलची प्राणज्योत मालवली. शोकाकुल वातावरणात तिच्या सासरी मोराणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना जितकी लोहोणेरकरांच्या काळजाला तडा देऊन गेली तितकीच तिच्या माहेरी अंबासन व सासरी मोराणे येथे हृदय हेलावून गेली. विवाहास एकवीस दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी घटना घडल्याने दुःखाची तीव्रता मोठी होती. लग्नाच्या वेळी काढलेल्या मेंदीचा रंग अद्याप सुकलेला नसताना लोहोणेर (ता. देवळा) येथे वास्तव्यास असलेल्या नवविवाहितेचा डेंगीने बळी घेतला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

bride
'शेतकरी नवरा नको'ला शेतकरीपुत्राचे उत्तर! पंचक्रोशीत कौतुक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com