नाशिक : सिन्नरमधील दूध भेसळीचे थेट कनेक्शन मुंबईशी...

Paraffin adulteration in milk
Paraffin adulteration in milkesakal

सिन्नर (जि. नाशिक) : मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या पॅराफीन (Paraffin) सदृश्य रसायनाची गाईच्या दुधात भेसळ करून विक्री करणाऱ्या दूध संकलन केंद्र चालकासह चार जणांच्या विरोधात नाशिक येथील अन्न भेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाने वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सिन्नर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी पाथरे येथील दूध संकलन केंद्र चालकासह राहुरी येथील पॅराफीन पुरवठा करणाऱ्या तरुणास ताब्यात घेतले असून भेसळीच्या या धंद्याची पाळेमुळे मुंबईपर्यंत रुजली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड मात्र फरार असून तो अटकपूर्व जामिनासाठी धडपडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Paraffin adulteration in milk
गर्दी जमवणे पडले महागात, नाशिकमध्ये सहा नगरसेवकांवर गुन्हा

अधीकचा नफा कमावण्यासाठी मानवी आरोग्याशी खेळ

सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे अक्षय ज्ञानेश्वर गुंजाळ याने आपल्या श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्रामार्फत जवळके तालुका कोपरगाव येथील न्यू शनेश्वर दूध संकलन केंद्रात पुरवठा करायचा. दूध व्यवसायात अधीकचा नफा कमावण्यासाठी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधामध्ये 'बे' पावडर, सोयाबीन रिफाईंड तेल आणि मानवी आरोग्यास अपायकारक असलेल्या 'पॅराफीन' सदृश्य रंगहीन रसायनांची भेसळ करताना अक्षय यास गेल्या आठवड्यात नाशिक येथील अन्नभेसळ प्रतिबंधक व सुरक्षा विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून त्याचेजवळून भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅराफीन या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या रसायनाचा साठा जप्त केला होता.

...थेट मुंबई कनेक्शन

शेख नामक व्यक्तीसह उजनी ता. सिन्नर येथील हेमंत पवार या इसमाकडून हे साहित्य विकत घेतल्याचे कबूली अक्षय याने दिली होती. त्यानुसारगुन्हा दाखल करून घेत सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते, उपनिरीक्षक प्रकाश गवळी, हवालदार दशरथ मोरे, पंकज मोंढे यांनी अक्षय गुंजाळ याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राहुरी येथून अफताफ कलीम शेख याच्या मुसक्या आवळल्या. शेख याचा राहुरीत विविध प्रकारचे ऑइल, बे पावडर विक्री करण्याचा व्यवसाय आहे. त्याच्याकडून गुंजाळ गेल्या सहा महिन्यापासून पॅराफीन ऑईलची खरेदी करत होता. या ऑइल पुरवठ्याची पाळेमुळे थेट मुंबईपर्यंत पोहोचली असून शेख याच्या माहितीवरून मुंबई येथील एक्सल इंटरनॅशनल या कंपनीच्या विक्री अधिकारी स्नेहलता शिंदे रा. कांदिवली यांनादेखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतले. कंपनीकडून शेख याला आत्तापर्यंत पॅराफिन तेलाचा किती पुरवठा झाला व त्याने तो कोणाला व कसा विकला याचा शोध पोलिस घेत आहेत. शेख याला आज न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी वाढवून दिली आहे.

Paraffin adulteration in milk
नाशिक जिल्ह्यात आज, उद्या अतिवृष्टीचा इशारा

मास्टरमाईंडची जामीनासाठी धडपड...

दूध भेसळीचे टेक्निक पुरवणारा मास्टरमाइंड म्हणून या गुन्ह्यात उजनी ता. सिन्नर येथील हेमंत पवार या तरुणाचा सहभाग असल्याची चर्चा आहे. एफडीएकडून (FDA) पोलिसात गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित पवार फरार आहे. पोलिसांनी त्याच्या गावी तसेच नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, तो मिळून न आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मात्र पवार याने नाशिकच्या जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. परंतु पोलिसांकडून गुन्ह्याची संबंधित माहिती न्यायालयात सादर न झाल्याने त्याच्या जामीन अर्जावरील सुनावणी रखडली असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com