Nashik News : सावधान...पाल्ये पोहण्यासाठी तर गेली नाहीत ना!

 swimming pool News
swimming pool Newsesakal

Nashik News : एकीकडे उकाडा वाढला असताना दुसरीकडे मखमलाबाद रोडवरील डाव्या कालव्याला आवर्तन सोडल्याने बहुतांश मुले पोहण्यासाठी धाव घेतात. मात्र पोहता येत नसल्याने अनेकदा मुले बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना आजवर घडलेल्या आहेत.

त्या पार्श्वभूमीवर आपली मुले पोहण्यासाठी कालव्यावर तर गेली नाहीत ना, याची खबरदारी पालकांनी घेणे गरजेचे आहे. (Parents beware about kids swwiming Precaution Required Necessity of maintenance in canal area Nashik News)

गंगापूर धरणापासून ते निफाड साखर कारखान्यापर्यंतच्या ५४ किलोमीटर लांबीचा गंगापूर धरणाचा डावा तट कालवा असून, या कालव्यात हिवाळ्यात तीन व उन्हाळ्यात तीन अशी सहा आवर्तने सोडण्यात येतात.

आवर्तनाच्या वेळी दुथडी भरून वाहणाऱ्या या कालव्याच्या पाण्यात डुबकी घेण्याचा मोह अनेक मुलांना होत असतो. त्यामुळे कालव्यात ठिकठिकाणी मुले पोहण्यास येतात. त्यातील अनेकांना पोहताही येत नाही.

मखमलाबाद- पेठ रोड लिंक रोडवरील तुळजाभवानीनगर येथून जाणाऱ्या गंगापूर धरणाच्या डाव्या तट कालव्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा मृत्यू यामुळेच झाला होता.

 swimming pool News
Nashik News: मांडवड आणि गिरणानगर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक संतोष जाधव निलंबित

कालव्याच्या खोदकामात माती, मुरूम, कच्चा व पक्का खडक लागलेला दिसतो. काही ठिकाणी कालवा रुंद आहे, अशा ठिकाणी त्याची खोली कमी आहे. मात्र अरुंद असलेल्या भागात त्याची खोली दहा ते पंधरा फूट खोल आहे.

त्यामुळे लहान मुलांच्या दृष्टीने हा कालवा धोकादायक आहे. शेतीच्या सिंचनासाठी सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाच्या वेळी कालवा तुडुंब भरून वाहत असल्याने अशा वेळी सोबत कुणी पट्टीचा पोहणारा असल्याशिवाय पाण्यात उतरणे धोकादायक होऊ शकते.

कालव्याच्या भागात सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभागाला किंवा इतर प्रशासनाने काही प्रयत्न करणे शक्य नाही. त्यामुळे पालकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 swimming pool News
Nashik 11th Admission : या वर्षी अकरावीच्या 26 हजार 720 जागा; सतराशेंनी भरला भाग दोन

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
दरवर्षी मे, जूनमध्ये शाळांना सुटी असते. त्यातच ऊन वाढलेले असल्याने अनेकदा मित्रांबरोबर अनेक मुले गोदाघाटावर वा कालव्यावर पोहण्यासाठी जात असतात. मात्र ज्या मुलांना पोहता येत नाहीत, अशी मुले पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत.

गेल्या डिसेंबर २०२१ मध्ये अशाच प्रकारे पोहण्यासाठी आलेल्या तीन मुलांचा पोहता येत नसल्याने कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे. या घटनेने कालव्याच्या भागातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

पाटबंधारे विभाग, मनपा अथवा पोलिस प्रशासनाने आवर्तन सोडल्यानंतर कालवा परिसरात बंदोबस्त ठेवणे गरजेचे आहे.

 swimming pool News
Nashik BJP News: लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी; आहेर, सानप यांच्यावर दोन्ही संघाची जबाबदारी

""पाटाला पाणी सोडल्यानंतर या भागात गस्त घालण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाने ज्या ठिकाणी पाण्यात उतरण्याची जागा आहे. त्या ठिकाणी सुरक्षा जाळ्या लावाव्यात. असे प्रकार घडू नये यासाठी पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

तसेच अशा भागात जाऊ नये याबाबत वेळोवेळी आपल्या पाल्यांना समजावून सांगितले पाहिजे. घटना घडल्यानंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा आधीच सावध राहणे खूप गरजेचे आहे.""
- महेश शेळके, जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

 swimming pool News
Nashik : संचमान्यतेसाठी अवैद्य आधारावर पडताळणीचा पर्याय; शाळांना दिलासा मात्र 90 टक्के वैधचा स्पीडब्रेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com