नाशिक: शहरातील पार्किंग व्यवस्था सुधारून वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याच्या उद्देशाने महापालिकेने ३५ वाहनतळे निश्चित केली आहेत. या संदर्भात स्मार्ट सिटी कंपनीच्या ठेकेदाराने जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता, मात्र न्यायालयाने कोणतेही आदेश न दिल्याने महापालिकेने स्थगिती उठल्याचे गृहीत धरून वाहनतळांसाठी निविदा काढण्याचा निर्णय घेतला आहे.