Nashik News: परसूलला पतीपत्नीने गळफास घेत संपवले जीवन

Death
Deathesakal
Updated on

सोग्रस : परसूल (ता.चांदवड) येथील पती-पत्नीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पतीने घराच्या छताला गळफास घेतला तर पत्नीने विषारी पदार्थ प्राशन करत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता.२४) दुपारी घडली.

घटनेची माहिती पोलिस पाटील सोनाली सोनवणे यांनी चांदवड पोलिसांना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. (Parsul hanged by her husband and wife Nashik News)

Death
Fraud Crime: विद्यापीठात बनावट दस्तावेज सादर केल्याप्रकरणी तक्रार; ॲड. विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाऊसाहेब एकनाथ बरकले (३७) व त्यांची पत्नी सुनीता (३०) हे राहत होते. शुक्रवारी दुपारच्या सुमारास भाऊसाहेब बरकले यांनी घरातील छताला गळफास घेतल्याचे एका ग्रामस्थांच्या लक्षात आले.

त्यांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली. पोलिस पाटील व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता पती भाऊसाहेब यांनी गळफास तर पत्नी सुनीता येणे काहीतरी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याचे घटनास्थळावर दिसून आले.

या दांपत्याने आत्महत्या का केली याचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी तपास करत आहेत.

Death
Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या दारासमोरच ‘मिनी कॅसिनो’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com