काझी गढीचा भाग कोसळला; 4 जणांची सुखरूप सुटका

 collapsed house on the bank as part of the Qazi Gadhi collapsed.
collapsed house on the bank as part of the Qazi Gadhi collapsed.esakal

जुने नाशिक : धोकादायक काझी गढीच्या काठावरील काही भाग खचला. त्यामुळे एका घराची भिंत कोसळली. या घरात अडकलेल्या चार जणांसह जनावरांची अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सुटका करण्यात आली. सुदैवाने दुर्घटना टळली. भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत येथील संरक्षण भिंतीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. (Part of Qazi garhi collapsed Safe escape of 4 persons Nashik Latest marathi news)

दरवर्षी पावसात काझी गढी हळूहळू कोसळण्याचे प्रकार घडतात. गढीचा बहुतांशी भाग खचून कोसळला आहे. यंदाच्या पावसातदेखील आत्तापर्यंत तीन वेळा गढीचा काही भाग खचण्याचे प्रकार घडले.

शुक्रवारी (ता.१९) चौथ्यांदा गढीचा कठडा कोसळला. काही दिवसापासून संततधार पावसामुळे गढीचा काठावरील भाग सकाळी साडेनऊच्या सुमारास कोसळण्याची घटना घडली. त्या भागावर अवलंबून असलेल्या घराची भिंत यामुळे ढासळली.

घरात येणे जाण्याच्या मार्गावरील भाग आणि भिंत कोसळल्याने चार जण आणि तीन बकऱ्या अडकल्या. शिवाय भागदेखील हळूहळू ढासळत होता. अग्निशामक विभागास माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटात अग्निशामक विभागाचे लीडिंग फायरमन दत्तात्रेय गाडे, इसाक शेख, शिवाजी फुगट, दिनेश लासुरे, संजय खोडे, महेश वाईंदरकर, श्री. आमले देवदूत वाहन घेऊन घटनास्थळी दाखल झाले.

 collapsed house on the bank as part of the Qazi Gadhi collapsed.
Swine Flu Update : धास्ती वाढली; 11 जणांचा मृत्यू

कोसळलेले घर अतिशय काठावर असून अन्य भागही हळूहळू ढासळत असल्याने अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडकलेल्यांना वाचविण्यात अडचण येत होती. शेवटी त्या घरात लागून असलेल्या एका बंद घराचा दरवाजा तोडून त्यांना आत प्रवेश करावा लागला.

त्या बंद घराची एक भिंत तोडून चौघांची आणि तीन बकऱ्यांची सुटका करण्यात आली. रोहित विजय खराटे (३५), विवेक विजय खराटे (४५), राधाबाई तुकाराम रणशिंगे (६५), सुनील रणशिंगे, असे सुटका केलेल्यांची नावे आहे.

अग्निशामक विभागाचे प्रमुख संजय बैरागी, पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, अग्निशामक विभागाचे उप-अधिकारी जगदीश आहेर, पश्चिम विभागाचे बांधकाम अभियंता प्रशांत बोरसे आदींनी पाहणी केली. अधिकाऱ्यांनी अन्य रहिवाशांची चर्चा करत त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना केल्या.

घटनेतील बचावलेले चौघे त्यांच्या नातेवाइकांच्या घरी स्थलांतरित झाल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. या घटनेने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 collapsed house on the bank as part of the Qazi Gadhi collapsed.
Nashik : पॅरोल रजेवरील फरारी संशयितास अटक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com