Malgaon News : पवित्र पोर्टल भरतीत अंशकालीन निदेशकांचा समावेश करा; मालेगावच्या शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांना घातले साकडे
Malgaon Part-Time Directors Raise Demand : मालेगावमधील कला, क्रीडा व कार्यानुभव अंशकालीन निदेशक संघटनेने शिक्षणमंत्री भुसे यांना मानधन व नियुक्तीसंदर्भात निवेदन सादर केले.
मालेगाव शहर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मानधनावरील अंशकालीन निदेशकांचा पवित्र पोर्टल भरतीत समावेश करण्यात यावा, अशी मागणी करून शिक्षणमंत्री दादा भुसे यांना साकडे घालण्यात आले.