नाशिककर वेदांतने वेधले जगभरातील तज्‍ज्ञांचे लक्ष्य! COP-26 मध्ये सहभाग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vedant Kulkarni

नाशिककर वेदांतने वेधले जगभरातील तज्‍ज्ञांचे लक्ष्य!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सतरावर्षीय वेदांत राहुल कुलकर्णी याने पर्यावरणविषयक आंतरराष्ट्रीय परिषद युथ फॉर क्लायमेट-‘ सीओपी-२६’ मध्ये सहभाग नोंदवला. परिषदेत विचार मांडताना त्याने जगभरातील तज्‍ज्ञांचे लक्ष वेधले. ग्लासगो आंतरराष्ट्रीय परिषदेहून वेदांतचे शुक्रवारी (ता. १९) सकाळी नाशिकमधील कृषीनगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील निवासस्थानी आगमन झाले, कुटुंबीय आणि मित्रपरिवारातर्फे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

वेदांतची कामगिरी संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद

इटली सरकारच्‍या इकॉलॉजिकल मंत्रालय आणि युनायटेड नेशन्स यांच्यातर्फे ऑक्‍टोबरमध्ये युथ फॉर क्लायमेट ही जागतिक परिषद झाली. या परिषदेसाठी वेदांतला ‘युथ ॲडव्हायझर’ म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले होते. तसेच, ग्लासगो (स्कॉटलंड) येथे नुकत्याच झालेल्‍या ‘सीओपी-२६’ या जागतिक हवामान बदल विषयावरील परिषदेत वेदांतने सर्व देशांतील युवकांचे प्रतिनिधित्व त्याने केले. प्रमुख निरीक्षकाच्या भूमिकेतून तेथील ‘वर्ल्ड लीडर्स समिट’मध्ये सहभाग नोंदविला. त्यामुळे तेथे उपस्थित सर्व देशांतील पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष, पर्यावरण मंत्री यांच्याशी संवाद साधण्याची आणि संपूर्ण तरुणांच्या वतीने विचार मांडण्याची संधी वेदांतला मिळाली.

हेही वाचा: आईवडिलांना वाटले की मुलगी इंजिनिअर किंवा डॉक्‍टर होईल, पण..!

तरूणांची मते जाणून घेत असताना निर्णयाचे अधिकार मिळावे - वेदांत

तरुणांमध्ये असलेल्या अफाट कल्पनाशक्तीचा वापर हवामानातील बदलांवर उपाय- योजना करण्यासाठी करता येईल, पण नुसता सल्ला ऐकून न घेता त्यांना निर्णय घेण्याची क्षमताही मिळावी असे मत वेदांतने ‘सकाळ’शी बोलताना मांडले. वेदांतने सांगितले या दोन्ही परिषदांमध्ये सामील सर्वच देशांनी हवामान बदलांवर काम करण्यासाठी सकारात्मकता दाखवली आहे. परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही वेदांतने आपल्या कार्याची माहिती दिली.

पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत भारतातसुद्धा सौरऊर्जेचा पुरेपुर वापर त्यासोबतच वाढत्या कार्बन उत्सर्जनावर काम करत आहोत याबद्दल सांगितले. ऑनलाइन अभ्यास करताना स्वतःच्या कौशल्यावर आणि स्वबळावर वेदांतने ही संधी खेचून आणली. भारतातून एकमेव उपस्थित झालेल्या वेदांतचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. नाशिकच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. त्याला आई-वडीलांचे प्रोत्साहन लाभले.

हेही वाचा: भारतीय वायुसेनेत 'ग्रुप सी'च्या अनेक पदांसाठी भरती, वाचा डिटेल्स

''वेदांतने हे यश पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने मिळवले आहे. त्याला मिळणारी संधी त्याने पूर्णपणे खात्री करूनच आम्हाला सांगितली. त्याने संपादित केलेल्या या यशाचा आम्हाला पालक म्हणून सार्थ अभिमान आहे.'' - प्रा. सोनाली व ॲड. राहुल कुलकर्णी, वेदांतचे आई- बाबा.

''वेदांतने हे यश पूर्णपणे स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने मिळवले आहे. त्याला मिळणारी संधी त्याने पूर्णपणे खात्री करूनच आम्हाला सांगितली. त्याने संपादित केलेल्या या यशाचा आम्हाला पालक म्हणून सार्थ अभिमान आहे.'' - प्रा. सोनाली व ॲड. राहुल कुलकर्णी, वेदांतचे आई- बाबा.

loading image
go to top