नाशिक : व्यक्ती नव्हे पक्ष महत्त्वाचा; शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजप आव्हान देणार

अंबड गावाचे विभाजन झाल्याने मतदानावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक बाजूला
नाशिक : व्यक्ती नव्हे पक्ष महत्त्वाचा; शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला भाजप आव्हान देणार

नाशिक : अंबड गावाचे विभाजन झाल्याने मतदानावर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक बाजूला पडला आहे. त्यामुळे राज्यातील इतर शहरांमधून स्थायिक झालेले तसेच परप्रांतीय मतदारांचा कल कोणाच्या बाजूने आहे, यावर बरीचशी गणिते अवलंबून राहणार आहे. ग्रामीण- शहरी भागाचे मिश्रण आश्विननगर सारख्या सुशिक्षित भागाचा समावेश या केमिस्ट्रीमुळे उमेदवारांना टप्प्याटप्प्यावर भूमिका बदलावी लागणार असल्याचे दिसून येते.

प्रभाग क्रमांक ३५ तयार होत असताना अंबड गावाचे चार भागात विभाजन झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मुळ गावठाणातील हजार ते बाराशे मतदान एवढेच शिल्लक राहिले. परिणामी मोरवाडी गावावर मतदारांची भिस्त वाढली आहे. राजवाडा, कोळीवाडा हा भाग प्रभाग ३६ जोडला गेल्याने गावचे हक्काचे मतदान हिरावले आहे. त्यामुळे अंबड गावठाणाच्या बाजूला असलेल्या राज्यातील इतर शहरातून, तसेच परप्रांतीयांच्या नगरातील नागरिक काय ठरवतील यावर निवडणुकीचे गणिते अवलंबून राहतील. या भागात शिवसेनेचा अधिक प्रभाव राहिला आहे.

दोनदा काँग्रेस व भाजपला २०१७ च्या निवडणुकीत भाजपचे दोन नगरसेवक वगळता आतापर्यंत शिवसेनेचेच अधिक नगरसेवक या भागातून निवडून आले आहेत. त्यामुळे यंदा मतदार शिवसेनेला पुन्हा तारणार की भाजप व अन्य पक्षांना साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रभागाची व्याप्ती

अंबड एमआयडीसी, नंदिनीनगर, चुंचाळे घरकुल, हॉटेल गेटवे, गरवारे कंपनी, सिम्बायोसिस कॉलेज, उत्तमनगर, मोरवाडी, अश्विनीनगर.

  • उत्तर - सातपूर अंबड लिंकरोडवरील एक्सलो जंक्शनपासून पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याने (त्रिमूर्ती चौकाकडे) उंटवाडी, अंबडकडे जाणाऱ्या (सिम्बायोसिस कॉलेज) रस्त्यापर्यंत. उत्तरेकडील रस्त्याने सिम्बायोसिस कॉलेज घेऊन सिडको सहावी स्कीमपर्यंत. उजवीकडे सहावी स्कीममधील सिलेक्स किचन फर्निचर शॉपची इमारत घेऊन व रूपल हार्डवेअरची इमारत सोडून दोन इमारतींच्या हद्दीने अंतर्गत रस्त्यापर्यंत. उत्तरेकडे दौलतनगर रस्त्या समोरील इमारत सोडून दोन इमारतींच्या मधून शालिनीताई बोरस्ते विद्यालयापर्यंत. उत्तरेकडे खुल्या जागेपर्यंत. डावीकडे श्री. गजानन मेडीकल स्टोअर्स घेऊन उंटवाडी अंबड लिंकरोडपर्यंत पुढे उत्तरेकडे उंटवाडी अंबड लिंक रोडने बुरकुले हॉलपर्यंत. उजवीकडे बुरकुले हॉल समोरील बोळीने एकता चौकापर्यंत. उत्तरेकडे बनीज बेकर्स रस्त्याने श्री. सर्वेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने प्रेरणा चौकाकडे जाणाऱ्या उत्तमनगर रोडपर्यंत. उत्तरेकडे जनता विद्यालयासमोरील प्रेरणा चौकापर्यंत. अंबड पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याने विजय नगर चौकापर्यंत. अंबड पोलिस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विजयनगर चौकापासून दक्षिणेकडे टी. जे. चव्हाण माध्यमिक विद्यालयापर्यंत. नीलकमल इलेक्ट्रिक समोरून पश्चिमेकडे श्रीदत्त मंदिर मोरवाडीपर्यंत. श्री दत्त मंदिर समोरील रस्त्याने दक्षिणेकडे द्विवेदी हाऊसपर्यंत. आर्यन किराणा अॅन्ड जनरल स्टोअर्स, सेंट लॉन्सेस स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत. संभाजी स्टेडिअमकडे जाणारा रस्ता ओलांडून स्वामी विवेकानंद जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याने मुंबई- आग्रा महामार्गापर्यंत.

  • पूर्व - मुंबई- आग्रा महामार्गावरील स्वामी विवेकानंद जलतरण तलावाकडे जाणाऱ्या रस्त्यापासून मुंबई-आग्रा महामार्गाने विल्होळी नाका महापालिका हद्दीपर्यंत.

  • दक्षिण- महापालिका हद्दीपासून चुंचाळे घरकुल योजना, एक्सलो, गरवारे रस्त्यावरील भगवती किराणा स्टोअर्स, ओमेगा इंजिनिअर्स, एक्सलो गरवारे रस्त्यापर्यंत. उत्तरेकडे एक्सलो जंक्शनपर्यंत.

  • पश्चिम - मुंबई- आग्रा महामार्गावरील विल्होळी नाका महापालिका हद्दीपासून चुंचाळे महापालिका घरकुल योजनेपर्यंत.

हे आहेत इच्छुक

किरण दराडे, कावेरी घुगे, शीतल भामरे, लक्ष्मण जायभावे, मंदाकिनी जाधव, नंदिनी जाधव, गोविंद घुगे, संजय भामरे, बाळा दराडे, भूषण राणे, शरद दातीर, गायत्री डोखे, विशाल डोखे, साहेबराव दातीर, नीलेश चव्हाण, सुनील जगताप, हर्षल चव्हाण, रोहिणी जगताप, रामदास साबळे, अक्षय परदेशी, संजिवनी गायकवाड, उत्तम काळे, माणिक जायभावे, संगीता काळे, नंदा जायभावे, धोंडिराम आव्हाड, सागर नागरे, भालचंद्र दोंदे, अनसूया दोंदे, गौरव केदार, विजय जमदाडे, सुनील घुगे, बाळासाहेब आठवले, जितेंद्र बागूल, शेखर निकुंभ, चंद्रकांत पाटोळे, प्रशांत खरात, सतीश आस्वरे, सुमीत जाधव, डॉ. चंचल साबळे, संदीप दराडे, पूजा पाटोळे, रूपाली काटे, विजय कापसे, संतोष केदारे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com