Passport Seva Kendra : विमानसेवेपाठोपाठ नाशिकमधील पासपोर्ट सेवाही ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Passport Seva Kendra

Passport Seva Kendra : विमानसेवेपाठोपाठ नाशिकमधील पासपोर्ट सेवाही ठप्प

नाशिक : नाशिकमधील विमानसेवेपाठोपाठ पासपोर्ट सेवाही ठप्प झाली आहे. सर्वर डाऊन असल्याने पासपोर्ट कार्यालयातील कामकाज ठप्प झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बाहेगावाहून पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी फिरावं लागत असून नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

हेही वाचा: Martial Arts Bruce Lee : जास्त पाणी प्यायल्यानं ब्रूस ली'चा मृत्यू? 49 वर्षांनंतर संशोधकांचा नवा दावा समोर

पासपोर्ट कार्यालयाकडून सेवा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु असून लवकरात लवकर ही सेवा सुरु करण्यात येईल अशी माहिती कार्यालय प्रशानसनाने दिली आहे.

विमानसेवेपाठोपाठ पासपोर्ट सेवाही ठप्प झाल्याने लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाकडे लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

हेही वाचा: Apple iPhone 15 : आयफोन १५चे फीचर्स लीक; एवढी असू शकते किंमत

या कारणामुळे विमानसेवा ठप्प

नियमित वार्षिक देखभाल दुरुस्तीचा भाग म्हणून विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे विमानसेवा ठप्प झाली असल्याने असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र नियोजित कामे पुर्ण झाल्यानंतर ही सेवा पुन्हा सुरु करण्यात येईल अशी माहिती विमानतळ प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे.