नाशिक: पाथर्डी फाटा येथील हॉटेलमालकाने वाढीव खंडणी देण्यास नकार दिला. त्यामुळे संशयित खंडणीखोरांनी कोयता घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस घालत तोडफोड केली. गल्ल्यातील रोकडही बळजबरीने काढून घेत हॉटेलमालकाला ठार करण्याची धमकी दिली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करीत चौघांना बेड्या ठोकल्या आहेत.