पाथर्डी गावात वाहनाची तोडफोड
इंदिरानगर पोलिसांकडून सहा जणांना अटक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी गावात कोयता व दगडांचा वापर करून वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या ६ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यम संतोष शिंदे (२५, रा. साईप्रसाद अपार्टमेंट, पाथर्डी रोड), वैभव सुभाष जाधव (२५, रा. नवप्रकाश अपार्टमेंट, उमेशनगर, पाथर्डी गाव), आदित्य अशोक साठे (१९, रा. म्हाडा वसाहत, पाथर्डी फाटा), विक्की विजय जाधव (१९, रा. मातृवंदन स्वराज्य नगर, पाथर्डी फाटा), सूरज विलास कसबे (१९, रा. शिवालिंक सदरु अपार्टमेट, कडवेनगर) आणि दीपक बाळू गवळी (२२, रा. कोंबडी गल्ली, पाथर्डी गाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर, समीर गवळी पसार झाला आहे.
सिद्धार्थ महेंद्र गरुड (२०, रा. राजवाडा, पाथर्डीगाव) याच्या फियार्दीनुसार, रविवारी (ता. १८) रात्री संशयितांनी फिर्यादीच्या दुचाकीची तोडफोड केली व परिसरात दगडफेक करून दहशत माजवली. यावेळी संशयित कसबे याने त्याच्याकडील धारदार कोयता गरुड यांच्या दिशेने हाणून फेकला. यानंतर संशयिताने हवेत कोयता फिरवून कोणी मध्ये आला तर जिवंत सोडणार नाही, अशा धमक्या दिल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.