Crime
sakal
नाशिक: बेथेलनगर येथील हवेत गोळीबार करणाऱ्या पवार टोळीच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ग्रामस्थांची वेशभूषा करीत कसून शोध घेतल्यानंतर पोलिसांची चाहूल लागल्याने परजिल्ह्यात पलायन करण्याच्या तयारीत असताना या म्होरक्याचा पोलिसांनी तब्बल १० कि.मी. पाठलाग करून त्यास जेरबंद केले आहे. पोलिसी खाक्या कळताच त्याला ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ल्या’ची उपरती झाली.