Nashik : Amrit Mahotsavसाठी रोषणाई देयके 15 लाखांच्या घरात

NMC News
NMC Newsesakal

नाशिक : महापालिकेकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सादर करण्यात आला. अमृत महोत्सव साजरा करताना महापालिकेच्या इमारतींवर मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली. त्या रोषणाईचे देयके १५ लाखाच्या घरात पोचली. यासंदर्भात आयुक्तांना संशय आल्याने विद्युत रोषणाईच्या निविदा दरांची माहिती मागविण्यात आली. (payments for Amrit Mahotsav 15 lakhs NMC Nashik Latest Marathi News)

NMC News
Swine Flu Alert : आतापर्यंत 22 जणांचा बळी

ऑगस्ट महिन्यात महापालिकेकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोरदार पद्धतीने साजरा करण्यात आला. महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांना विद्युत रोषणाई करण्यात आली. त्याचबरोबर महापालिका मुख्यालयात वरांड्यातील ग्रीलला तिरंगी कापडाची झालर लपटण्यात आली होती.

त्याचवेळी अनेकांनी या उधळपट्टीवर संशय व्यक्त केला होता. आता हा संशय खरा ठरताना दिसत आहे. विद्युत रोषणाईपोटी १४ लाख दहा हजार रुपयांचा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विद्युत रोषणाईच्या देयकांसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले.

विद्युत रोषणाईसाठी निविदा प्रक्रिया राबवली होती का, या प्रश्नावर विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी वार्षिक दर मंजूर असल्याचा दावा केला. त्यानंतर आयुक्तांनी दर माहिती पत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या.

NMC News
Crime Update : PAN Card अपडेटच्या नावाखाली 5 लाखांना गंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com