नाशिक- एमएचटी-सीईटी परीक्षेअंतर्गत ‘पीसीबी’ ग्रुपच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. १७) सकाळी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकच्या ओम आहेर या विद्यार्थ्याने शंभर पर्सेंटाईल गुण पटकावले. राज्यात केवळ चौदा विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाईल गुण मिळाले. ओमसह नाशिकच्या इतरही विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.