फ्लाइंग सिख यांच्‍या स्मृतींना नाशिककरांकडून उजाळा

Milkha Singh
Milkha Singh Sakal

नाशिक : फ्लाइंग सिख म्‍हणून जगविख्यात धावपटू मिल्खा सिंग यांच्‍या निधनाने अवघे विश्‍व स्‍तब्‍ध झाले आहे. त्‍यांच्‍या नाशिक भेटीच्‍या स्‍मृतींना उजाळा देताना त्‍यांनी दिलेल्‍या प्रोत्‍साहनाची आठवण शनिवारी (ता.१९) सांगण्यात आली. पूर्वी प्रशिक्षक अन् सुविधा नव्‍हत्‍या. सध्या उत्तम मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्टेडिअम उपलब्‍ध असताना शासनही प्रोत्‍साहन देत आहे. तरीदेखील साठ वर्षांत देशात दुसरा मिल्‍खा सिंग तयार होऊ शकला नसल्‍याची खंत २०१३ मधील कार्यक्रमात त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती. (people of Nashik paid homage to the memory of Milkha Singh)

श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट यांच्‍यातर्फे डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली जागतिक हृदय दिनानिमित्त २९ सप्‍टेंबर २०१३ मध्ये आरोग्‍यम धनसंपदा कार्यक्रम पार पडला होता. गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयाच्‍या मैदानावर झालेल्‍या या कार्यक्रमास मिल्‍खा सिंग उपस्‍थित होते. नाशिककरांकडून झालेल्‍या स्‍वागतामुळे ते भारावून गेले होते. या वेळी काढलेल्‍या रॅलीत सहभागी मिल्‍खा सिंग यांची झलक मिळविण्यासाठी चाहत्‍यांनी मोठी गर्दी केली होती. उपस्‍थितांशी संवाद साधताना मिल्‍खा सिंग म्‍हणाले होते, की यश मिळवण्यासाठी धावपटूंनी मेहनत घ्यायला हवीच. पण त्‍यांच्‍यापेक्षाही दुप्पट मेहनत प्रशिक्षक व पालकांनी घ्यायला हवी. देशाचे नाव उंचविण्यासाठी खेळण्याचा सल्‍ला त्‍यांनी खेळाडूंना दिला होता.

Milkha Singh
नाशिकमध्ये मॉल सुरु करण्यास परवानगी; दुपारी चारपर्यंत राहणार सुरु

नाशिकच्‍या भूमीतून घडावे मिल्‍खा सिंग

नाशिकच्‍या भूमीतील अनेक धावपटू चांगली कामगिरी करताना बघायला मिळत आहेत. या ठिकाणी आगामी काळात दोन- तीन मिल्‍खा सिंग घडले तर सर्वाधिक आनंद होईल, अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली होती. यानिमित्त त्‍यांच्‍या आठवणींना उजाळा देण्यात आला.

मिल्‍खा सिंग यांचा नेहमीच आदर्श: कविता राऊत

कुठल्‍याही सुविधा नसतांनाही मिल्‍खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्‍तरावर भारताचा तिरंगा फडकविला. अवघ्या काही सेकंदांच्‍या फरकाने ऑलिंपिक स्‍पर्धेत पदक हुकले. अशा मिल्‍खा सिंग यांचा आदर्श ठेवतानाच सराव केला व स्‍पर्धांमध्येही भाग घेतला. त्‍यांच्‍या निधनाने क्रीडा क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्‍याची भावना आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत-तुंगार हिने व्‍यक्‍त केली.

(people of Nashik paid homage to the memory of Milkha Singh)

Milkha Singh
नाशिकमध्ये मृतांच्या आकडेवारीवरून प्रशासनात कलगीतुरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com