काहीच न करणाऱ्या नगरसेवकांना मतदार दाखवणार घरचा रस्ता | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Politics

काहीच न करणाऱ्या नगरसेवकांना मतदार दाखवणार घरचा रस्ता | Nashik

सिडको (नाशिक) : मागील पाच वर्षात नागरिकांच्या संपर्कात नसणाऱ्या, प्रभागात कुठल्याही प्रकारचे विकासकामे न करणाऱ्या व नेहमीच ‘आपण यांना पाहिलंत का’, या भूमिकेत असणाऱ्या काही विद्यमान नगरसेवकांना या वेळी मतदार राजा मात्र घरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये रंगल्याचे बघायला मिळत आहे.

कारणे देणाऱ्यांना आता थारा नाही

मागील पाच वर्षांमध्ये अनेक नगरसेवकांनी नागरिकांच्या साध्या, सोप्या समस्या सोडविल्या नाही. ते नागरिकांना कधी भेटले नाही व कधी राम- राम ही केला नाही. साधे तोंडही दाखविले नाही, प्रभाग सभेत नेहमीच अनुपस्थित राहिले. नागरिकाचे प्रश्न व समस्याही मांडल्या नाही. ज्यांनी मागील निवडणुकीत केवळ आश्वासने दिली, त्याची साधी पूर्तता व दखलदेखील घेतली नाही. कोरोनाकाळात ज्यांनी नेहमीच नागरिकांच्या भीतीने तोंड लपविले, त्यांची साधी विचारपूसही केली नाही. त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाले नाही. प्रभागात साधी धूर फवारणी, चौकात बाकडे, हॅलोजन, दुभाजक, विद्यार्थ्यांना प्रवेश, वह्या पुस्तक पुरविले नाही. गल्लीबोळातील रस्ते, पाणी, ड्रेनेज अशी साधे काम केले नाही.

हेही वाचा: ‘कॉन्सन्ट्रेटर’ जमा करा अन्यथा निवडणुकीला बंदी

रुग्णवाहिका, वैकुंठधाम रथाची व्यवस्था केली नाही. ज्या महिला नगरसेवकांनी प्रभागात साधा नावाला हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमालाही महिलांना कधी विचारले नाही. प्रभागात कधी फिरकले नाही, नागरिकांनी फोन केले असता मी अमरधाममध्ये आहे, मी मीटिंगमध्ये आहे, मी गाडी चालवतोय, एका कामानिमित्त मुंबईला आलो आहे, मी महासभेत आहे असेच नेहमी उत्तरे दिली. अशा सर्व नगरसेवकांना या वेळी मात्र घरचा रस्ता दाखविण्यासाठी मतदार राजाने चांगलीच कंबर कसली आहे. अशाप्रकारे भूलथापा देऊन नागरिकांची एक प्रकारे फसवणूक करणाऱ्या व पाच वर्ष ‘आपण यांना पाहिलंत का’ च्या भूमिकेत असणाऱ्या विद्यमान नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवणार असल्याची चर्चा सध्या प्रभागांमधील कट्ट्या-कट्ट्यावर चर्चिली जात आहे. त्यामुळे अशा प्रकारे नागरिकांच्या भावनेशी खेळ खेळणाऱ्या विद्यमान नगरसेवकांना पुन्हा निवडून येण्याची भीती निर्माण होऊ लागल्याचेदेखील चित्र बघायला मिळत आहे.

हेही वाचा: ''आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून 'हा' निर्णय'' | Farm Law Repeal

loading image
go to top