नाशिक : शहरात स्वतःसह इतरांच्‍या जिवाशी खेळ सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik

नाशिक : शहरात स्वतःसह इतरांच्‍या जिवाशी खेळ सुरू

नाशिक : गेल्‍या पंधरा दिवसांत कोरोना प्रादुर्भावाची स्‍थिती चिंताजनकरीत्या बदलली आहे. जिल्ह्यातील कोरोना फैलावाच्‍या केंद्रस्‍थानी नाशिक शहर राहतो आहे. परंतु, काही शहरवासीयांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्‍याचे दिसून येत आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विनामास्‍क(without mask) व सोशल डिस्‍टंसिंगकडे(Social distancing) पूर्णपणे दुर्लक्ष करत वावरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. कोरोना(corona) फैलाव करण्याच्‍या दृष्टीने असे नागरिक कोरोना बॉम्‍ब ठरण्याची भीती व्‍यक्‍त होते आहे.

हेही वाचा: 'आई मला माफ कर, मी गेल्यावर त्रास होईल पण..' 24 वर्षीय विवाहितेची आत्महत्या

नाताळ व त्‍यानंतर वीकएंड निमित्त खरेदीचा उत्‍साह नाशिककरांमध्ये बघायला मिळाला. यामुळे शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसली. शनिवारी (ता.१) आणि रविवारी (ता. २) सुट्टीची संधी साधत अनेकांनी खरेदीसाठी पावले बाजारपेठेकडे वळविली. परंतु, या तुफान गर्दीत अनेकांनी कोरोना प्रतिबंधासाठी बचावात्‍मक उपाय म्‍हणून साधा मास्‍कदेखील लावलेला नसल्‍याचे चित्र होते. तर गर्दीत सोशल डिस्‍टंसिंगकडेही पूर्णपणे दुर्लक्ष झालेले होते. अशा नागरिकांकडून स्वतःसह इतरांच्‍या जिवाशी खेळ सुरू असल्‍याचे बोलले जात आहे. चालते फिरते कोरोना बॉम्‍ब असलेल्‍या बेशिस्‍त नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होते आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये उल्‍कावर्षाव पाहण्याची आज संधी

शिवाजी रोड, मेनरोड परीसरातील रस्‍ते अतिक्रमणाने व्‍यापलेले बघायला मिळत आहेत. यामुळे मुळचा रस्‍ता अरुंद होत असून, गर्दी दाट होते आहे. या अतिक्रमणामुळे शारीरीक अंतर राखले जात नसल्‍याची स्‍थिती होती.

बाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ सुरूच

नाशिक महापालिका क्षेत्रात आढळणाऱ्या दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. जिल्ह्यात आढळणाऱ्या बाधितांपैकी निम्‍याहून अधिक बाधित हे शहरातील राहत आहे. तुलनेत कोरोनामुक्‍त रुग्‍णांची संख्या कमी राहत असल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत सातत्‍याने वाढ नोंदविली जाते आहे. सध्या नाशिक महापालिका क्षेत्रात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या शनिवारी (ता. १) पर्यंत ४०७ वर पोचली होती

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top