Latest Marathi News | नाशिकच्या युवकांचे मलेशियात सादरीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Young artists of Nashik performing in musical events at

Nashik : नाशिकच्या युवकांचे मलेशियात सादरीकरण

नाशिक : मलेशियातील क्वालालंपूर, ब्रिकफिल्ड, मल्लका, कलांग येथे झालेल्या सांगितिक कार्यक्रमात येथील पवार तबला ॲकॅडमी, कलानंद कथक नृत्य संस्था, आदिताल तबला ॲकॅडमी व के. के. वाघ कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. यामध्ये आनंदी अथणी, केतकी चौधरी, श्रावणी मुंगी, ऋतुजा चंदात्रे, तनिष्क तांबट, हिमांशू बर्वे, मंदार पवार, आदिती निलखे, अंकिता शिरसाट, वैष्णवी जगताप, ऐश्‍वर्या गोखले, ध्रुव बालाजीवाले, आर्य देशपांडे यांचा समावेश होता. (Performance of Nashik Youth in Malaysia Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: YIN Art Festival : रंगभूमी गाजवणाऱ्या पात्रांच्या विविध आठवणींना उजाळा

त्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये तबला, गायन आणि कथक नृत्य सादर केले. त्यांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाहवा मिळाली. विविध भजने, ताल प्रस्तुती याद्वारे कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आला. सुर संगीत म्युझिक सेंटरतर्फे झालेल्या या कार्यक्रमांसाठी मलेशियातील अरविंदरसिंग रैना यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांसोबत असलेले नाशिकचे प्रसिद्ध कलाकार नितीन पवार, नितीन वारे, सुमुखी अथणी, पं. अविराज तायडे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा: YIN Art Festival : कागदांच्या चिरोट्यातून रेखीव Collage Work