YIN Art Festival : कागदांच्या चिरोट्यातून रेखीव Collage Work

A female student engrossed in collage work at the 'Sakal-yin' art festival on Friday in the premises of MSW College of MVIPR on Gangapur Road.
A female student engrossed in collage work at the 'Sakal-yin' art festival on Friday in the premises of MSW College of MVIPR on Gangapur Road.esakal

नाशिक : निरुपयोगी कागदांना एकतर आपण रद्दीत देतो किंवा फेकून देतो. परंतु अशा टाकाऊ वा रद्दीत टाकणाऱ्या कागद, वह्या, मॅगेझिनच्या चिरोट्यांपासून चांगले कोलाज वर्क करताना पाहण्याची संधी अनेकांना लाभली. निमित्त होते, ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाचे... या महोत्सवाच्या माध्यमातून कोलाज वर्क करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या कलाकृती तयार करून त्या सादर करण्याची संधी उपलब्ध झाली. (YIN Art Festival Collage Work competition Nashik News)

A female student engrossed in collage work at the 'Sakal-yin' art festival on Friday in the premises of MSW College of MVIPR on Gangapur Road.
YIN Art Festival : तरुणाईच्या अभिनय क्षमतेचा मूक अभिनय स्पर्धेत कस

गंगापूर रोडवरील मविप्रच्या एमएसडब्ल्यू महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘सकाळ-यिन’च्या कला महोत्सवाला शुक्रवार (ता. ११)पासून उत्साहात प्रारंभ झाला. महाविद्यालयाच्या हिरवळीवर रंगलेल्या या स्पर्धेसाठी शहरासह जिल्हाभरातून विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेषत: विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या अनेकांना कोलाज वर्क काय असते, याचीही माहिती नव्हती.

मात्र, कोलाज वर्क गटात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, त्यांनी आपापले कोलाज करण्यास प्रारंभ केला, तेव्हा अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक वाटत होते. एका विद्यार्थिनीने जुन्या मासिकाचे कात्रण केले. त्या कात्रणांच्या माध्यमातून मानवी चेहऱ्याचे निरनिराळे हावभाव व्यक्त होणारे कोलाज वर्क तयार केले.

A female student engrossed in collage work at the 'Sakal-yin' art festival on Friday in the premises of MSW College of MVIPR on Gangapur Road.
YIN Art Festival : ‘प्रहसना’मधून सामाजिक विषयांची संवेदनशील मांडणी

तर एका विद्यार्थिनीने विविध कडधान्यांच्या डाळींपासून कोलाज बनविले. या वेळी सोशल मीडिया, सामाजिक भावभावना व्यक्त करणारे कोलाज बनविताना स्पर्धक विद्यार्थी अक्षरश: त्यात रंगून गेले होते. या स्पर्धेसाठी योगिता क्रिएटिव्हज्‌च्या संचालिका योगिता भोजवानी परीक्षक होत्या.

"सध्याच्या मुलांमध्ये जबरदस्त टॅलेंट आहे. त्यांना त्यांचे टॅलेंट दाखविण्यासाठी ‘सकाळ-यिन’च्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी ज्याप्रकारे कोलाज वर्क केले आहे, ते पाहून मन सुखावून जाते. विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन, तर मिळतेच शिवाय संधीही उपलब्ध होत आहे."

- योगिता भोजवानी, संचालिका, योगिता क्रिएटिव्हज्‌, नाशिक

A female student engrossed in collage work at the 'Sakal-yin' art festival on Friday in the premises of MSW College of MVIPR on Gangapur Road.
YIN Art Festival : रंगभूमी गाजवणाऱ्या पात्रांच्या विविध आठवणींना उजाळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com