नाशिक- कुंभनगरी म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर शहरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरले आहे. महादेव मंदिराच्या अगदी जवळून जाणाऱ्या नदीत अत्यंत दूषित पाणी साचले. कुंभमेळ्याच्या निमित्ताने २०१५ मध्ये बांधण्यात आलेले घाट ओस पडले असून, त्यातील काही ठिकाणी दशक्रिया पूजा विधी चालतात. दूषित पाणी, अस्वच्छता आणि मोकाट जनावरांचा उच्छाद या समस्यांवर मात करून प्रशासनाला आगामी कुंभमेळ्याचे नियोजन करावे लागेल.