नाशिक : निवृत्त बँक अधिकाऱ्याला भामट्याने लावला चुना

ATM
ATM esakal
Updated on

सिडको (नाशिक) : एटीएम कार्डची (ATM) अदला बदल करून एका भामट्याने निवृत्त बँक अधिकाऱ्याला तब्बल २८ हजार रुपयांना हातोहात गंडविले. या प्रकरणी अंबड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अश्‍विननगर येथे संबंधीत निवृत्त अधिकारी नेहमीप्रमाणे परिसरातील एटीएममध्ये दोन हजार रुपये काढण्यासाठी गेले होते. पैसे काढून झाल्यानंतर एटीएम कार्ड अडकले म्हणून त्यांनी मागे उभ्या असलेल्या एका ग्राहकाची मदत मागितली. त्याने एटीएम कार्ड काढून त्यांच्या हातात दिले. थोड्याच वेळात त्यांना आपल्या खात्यातून १८ हजार रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यानंतर एका पेट्रोल पंपावरून दहा हजार रुपयाचे पेट्रोल भरल्याचा मेसेज आला. त्यामुळे, त्यांनी आपल्याकडे असलेले एटीएम कार्ड तपासून पाहिले असता, ते बनावट असल्याचे दिसून आले. त्यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ आपल्या एका नातेवाईकाशी संपर्क साधून टोल फ्री नंबरवरून बँकेकडून एटीएम कार्ड बंद करून घेतले व तातडीने पोलीसांत तक्रार नोंदविली.

ATM
प्रेमाचा विजय अन् दोनदा लागलं लग्न
ATM
ज्येष्ठांना तारुण्य देणारा आविष्कार!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Revises TET CTET Teacher Promotion Rules
Chhagan Bhujbal on Nashik road potholes
Nashik Pothole Issue
Nashik Weather Alert Saptashrungi Gad Nanduri Ghat Closed for Traffic Due to Heavy Rain and Strong Winds
Marathi News Esakal
www.esakal.com