Nashik News | उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

नाशिक : उड्डाणपुलावर उभ्या कंटेनरला कारची धडक; एक ठार

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : उड्डाणपुलावर नादुरुस्त कंटेनरवर पाठीमागून भरधाव येणारी अल्टो कार आदळल्याने कारमधील चौघांपैकी एकाचा जागीच मृत्यु झाला. ही घटना शनिवारी (दि.13) रात्री कन्नमवार पुलाजवळ घडली. कारमधून चौघे सख्खे भाऊ पारोळ्याहून नाशिकला येत होते. तिघे जखमी झाले असून एक गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

धुळे बाजूकडून नाशिककडे येताना उड्डाणपुलावर एक कंटेनर नादुरुस्त झाल्याने उभा होता. रात्रीच्या अंधारात कंटेनर लक्षात न आल्याने अल्टो (एम.एच 15 एफएफ 9458) कार पाठीमागून जाऊन कंटेनरवर आदळली. उभ्या कंटेनर वर मागून जाऊन अल्टो मोटार आदळली. कंटेनर चालक-क्लीनर कडून कंटेनरच्या पाठीमागे कुठल्याही प्रकारचे रेडियम बोर्ड लावण्यात आलेला न्हवता तसेच कंटेनरचे दिवेही बंद होते. यामुळे अल्टो कारचालकाला कंटेनरचा अंदाज आला नाही आणि कार कंटेनरवर जाऊन आदळली. कारमधून वसंत शंकर पाटील ( 55, रा. पाथर्डीफाटा), देवीदास पाटील, रवींद्र पाटील, राजीव पाटील हे गंभीर जखमी झाले. यापैकी मयत व्यक्तीचे नाव उशिरापर्यंत समजू शकलेले नाही. भद्रकाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

हेही वाचा: मालेगाव शहरातील जनजीवन पूर्वपदावर; हिंसाचारप्रकरणी ५ गुन्हे दाखल

loading image
go to top